Latur Election 2025 Results: सत्ताधारी भिडले, सत्ताधारीच जिंकले; लातूर जिल्ह्यातील निकालांनी राजकीय समीकरणं बदलली, महानगरपालिका निवडणुकीवर थेट परिणाम?

Dec 26, 2025 - 14:41
 0  1
Latur Election 2025 Results: सत्ताधारी भिडले, सत्ताधारीच जिंकले; लातूर जिल्ह्यातील निकालांनी राजकीय समीकरणं बदलली, महानगरपालिका निवडणुकीवर थेट परिणाम?

लातूर : लातूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा दबदबा कायम राहिला. चार नगरपरिषद आणि एका नगरपंचायत निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आपापसात भिडले, तरी सत्ता त्यांच्याकडेच राहिली. पारंपरिक विरोधक काँग्रेस या लढतीत प्रभावी ठरू शकली नाही, ज्याचा थेट परिणाम आगामी लातूर महानगरपालिका निवडणुकीवर दिसणार आहे.निलंगामध्ये भाजप कार्यकर्त्यांत प्रचंड जल्लोष दिसला, तर उदगीर,

            अहमदपूर आणि रेणापुरमध्येही भाजपाने सत्ता मिळवली किंवा सामाईक युतीत महत्त्वाची जागा जिंकली. औशामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने बहुमतासह नगराध्यक्ष पद पटकावले, तर उरुळीमध्ये भाजप आणि शिंदे शिवसेनेने जागा ताब्यात घेतल्या. काँग्रेस या ठिकाणी पूर्णपणे अपयशी ठरली. उदगीरमध्ये भाजप–राष्ट्रवादी युतीने ४० पैकी ३३ जागा जिंकून सत्ता एकहाती मिळवली.सत्ताधाऱ्यांकडून नियोजनबद्ध ताकद मैदानात होती. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार,

              मंत्री बाबासाहेब पाटील आणि माजी मंत्री संजय बनसोडे सक्रिय होते. काँग्रेसचा लढा मात्र आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वावरच मर्यादित राहिला.भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येऊन लातूर जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याचा निर्धार करत आहेत. आता प्रश्न इतकाच की, आगामी लातूर महानगरपालिकेत काँग्रेस प्रतिकार उभा राहू शकणार का? की सत्ताधारी पुन्हा आपापसात उभे राहतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow