लातूर महानगरपालिकेत 18 प्रभागांतील 70 जागांसाठी रणसंग्राम, काँग्रेसह भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी..

Dec 26, 2025 - 14:32
Dec 26, 2025 - 14:33
 0  1
लातूर महानगरपालिकेत 18 प्रभागांतील 70 जागांसाठी रणसंग्राम, काँग्रेसह भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी..

 

लातूर : तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२५ रोजी मतदान होणार आहे. शहरातील १८ प्रभागांतील ७० जागांसाठी ही निवडणूक होणार असून, राजकीय रणसंग्राम पाहायला मिळणार आहे.काँग्रेस आणि भाजपासह शिवसेना (दोन्ही गट), राष्ट्रवादी काँग्रेस (दोन्ही गट), वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, एमआयएम या पक्षांचेही आव्हान आहे.

            वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) यांची आघाडी कितपत जमेल, आणि भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्यात महायुती कितपत शक्य होईल, हा  प्रश्न चर्चेत आहे.लातूर महानगरपालिकेची इतिहास:२०१२: काँग्रेस ५१ जागा जिंकून बहुमत मिळवले; भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती ,२०१७: भाजपाने ३६ जागा जिंकून सत्ता मिळवली; काँग्रेस ३१ जागांवर मर्यादित राहिली.  या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी आहे. एक-एक प्रभागात ५-१० जणांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे.

मतदारसंख्या:

एकूण मतदार: ३,२१,३५४

प्रभागनिहाय मतदारसंख्या: प्रभाग १ – २०,३१०, प्रभाग ९ – २०,५५३, प्रभाग १८ – १२,४७५

आरक्षण:

  • अनुसूचित जाती – १२ जागा (६ महिला)

  • अनुसूचित जमाती – १ जागा

  • मागास प्रवर्ग (ओबीसी) – १८ जागा (९ महिला)

  • सर्वसाधारण – ३९ जागा (२० महिला)

उमेदवारांची संपत्ती देखील चर्चेचा विषय आहे; २०१७ मध्ये ३९६ उमेदवारांपैकी ५४ करोडपती होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow